अमिताभ.... चित्र पट-एका बहुआयामी कलाकाराचा - अमिताभ.... चित्र पट- एका बहुआय

  • 6.2k
  • 2
  • 2.4k

हिंदी चित्रपट सृष्टीतील तारे- तारकांच्या यादीत अढळपद प्राप्त केलेले , हिंदी चित्रपटाचे “शहेनशहा” म्हणून आपल्या कर्तृत्वाने तळपणारे, “अँग्री यंग मॅन” ची आपली प्रतिमा गाजवत हिंदी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे नाव.... अर्थातच अमिताभ.... अमिताभ हरिवंशराय (श्रीवास्तव) बच्चन.... हिंदू अवधी कायस्थ कुटुंबात ,अलाहाबाद येथे ११ ऑक्टोबर १९४२ या दिवशी अमिताभ यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल प्रख्यात हिंदी कवी श्री. हरिवंशराय बच्चन. अमिताभ यांच्या आई तेजी बच्चन या शीख कुटुंबातील असून सामजिक कार्यातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. हरिवंशराय यांचा “मधुशाला” हा हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवितासंग्रह असून हिंदी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. कविमनाचे वडील आणि