जोशीमठ ते औली - माणसांच्या आतमीयतेची अनुभूती - एक धाडसी आणि हुरहुर लावणारी

  • 5.2k
  • 1.4k

एक अख्खा दिवस तिथलं सृष्टीसौदर्य आणि निवांतपणा अनुभवला आणि नियोजनाप्रमाणे हरिद्वारकडे प्रवासाची सांगता करायला मार्गस्थ झालो.भल्या पहाटे बोचर्‍या थंडीत मी आणि आशुतोष हरिद्वारला यायला निघालो.चालत बसथांब्यापाशी आलो. बाहेर पडल्यावर कळलं की गाड्या भरभरून वाहत आहेत कारण आधीच्या land slide मुळे अडकलेले लोक आता दोन दिवस वाट पाहिल्यावर रस्ता मोकळा झाल्याने परतीला निघाले आहेत. आजही गाडीअभावी रहावे लागणार बहुधा... विष्णु फारच प्रेमात पडलाय आपल्या.... एक तिथल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे छोटी बस आली.मी खिडकीतून घुसून जागा पकडली अक्षरशः.... तेव्हा जमत होतं म्हणा.... कंटाळलेल्या प्रवाशाँशी हुज्जत घालणारा कंडक्टर ड्रायव्हर आणि गर्दी... पण आज सूर्यास्ताला हरिद्वार दिसणार तर.. बसलो तसेच चूपचाप. आमच्या नियोजनात कायमच सगळीकडे एक दिवस मोकळा राखलेला होता दोन्ही हिमालय पदभ्रमणात.लहरी निसर्गावर रागावण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी...