डाक्टरकी-सुभान्या - सुभान्या

  • 7.2k
  • 1.7k

विळखा मला अजून आठवते सुभान्याच्या पत्नीची ती भकास नजर....कधी कधी परिस्थिती, नियती, योगायोग असं सगळंच हातात हात घालून येतं. आणि सटवाईचा लेखाजोखा असणारच कुठेतरी.असं दुर्दैवानं म्हणावं लागतं.अगदी अापल्यासारख्या विवेकवादी माणसालाही.सुभानराव म्हणून माझं एक पेशंट .अंगठाछाप पण बोलण्यात भल्याभल्यांना हरवेल असा.अंगची हुशारी आजमावण्यासाठी मुंबईला गेला. तिथे भरपूर पैसा कमावला.देखणी ,गोरीपान ,त्याची हाजी हाजी करणारी बायको .एक मुलगा ,एक मुलगी .सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं.कधीतरी शौक म्हणून पिणं होत होतं.वरातीमध्ये त्या नशेत हजारोंनं पैसे उधळायचा सुभानराव. त्याच्या बायकोला चिंता वाटण्याऐवजी अभिमान वाटायचा त्याचा.हळू हळू धंद्यात जरा मंदी आली. पिण्यासाठी ' वरात ' सोडून अजून एक कारण मिळालं .तरीपण बायको तशी