२१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३

  • 9.1k
  • 2.5k

२१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३ राजस्थान प्रेक्षणीय स्थळे- २. उदयपुर- द सिटी ऑफ लेक्स.. उदयपुर 'सिटी ऑफ लेक्स' म्हणून ओळखले जाते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व मेवाडची राजधानी चित्तोडगढहून उदयपूरला हलवली. १८१८ पर्यंत मेवाडची राजधानी राहिलेले उदयपूर ब्रिटीश राजवटीमध्ये राजपुताना एजन्सीचा भाग होते. उदयपूर जयपूरच्या ४०३ किमी नैऋत्येस तर अहमदाबादच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे. सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. ह्या शहराच्या चहुबाजूने अरावली पर्वतरांग आहे. त्यामुळे हे शहर अधिकच देखणे झाले आहे. ह्या 'व्हेनिस ऑफ द इस्ट' मध्ये विपुल निसर्गसंपत्ती आहे. त्याचबरोबर इथली देवळे प्रसिद्ध आहेत. इथल आर्किटेक्चर अर्थात वास्तुकला अप्रतिम आहे जी एकदा तरी