अ मिटिंग - विथ मिस्टर वाघ

  • 4.9k
  • 3
  • 1.5k

"अ मिटिंग" - विथ मिस्टर वाघ! लेखक - सूरज काशिनाथ गाताडे. 1. मिस्टर वाघचे घर. दिवस... दिवस असूनही त्याचे घर अनाकलनीय गूढ शांततेत वसलेलं असल्यासारखे वाटते. का कोणास ठाऊक; पण वाटते... आत, माजघरात मिस्टर वाघ लँडलाईनवर बोलत होता... मिस्टर वाघ : हा इन्स्पेक्टर, सुजित प्रभाकर यांच्या केसमध्ये वापरण्यात आलेलं मर्डर वेपन तुम्ही माझ्या घरी घेऊन येऊ शकता? पलीकडून इन्स्पेक्टरचा आवाज... इंस्पेक्टर: काय झालं मिस्टर वाघ? कारण केस तर आधीच क्लोज झाली आहे. मग तुम्ही ती परत रि-ऑपन का करू इच्छिता? मिस्टर वाघ: सुजित यांच्या पत्नी काल माझ्याकडे येऊन गेल्या. मी या केसची फेर तपासणी करावी अशी त्यांची इच्छा आहे. मला