हीच खरी कर्तव्यनिष्ठा...

  • 4.2k
  • 1
  • 1.1k

... हीच खरी कर्तव्यनिष्ठा....    "" आई, गरमागरम पोहे खाऊन घे बरं. तुझ्यासाठी पोह्यांची डिश टेबलवर ठेवली आहे. " असं म्हणत स्वप्नालीने तिच्या आईला आवाज देऊन सांगितले व एका हाताने घाईघाईत स्वतः पोहे खाता खाता ती दुसर्‍या हाताने स्वतःचा टिफिन बॉक्स भरु लागली. स्वप्नालीची अशी रोजचीच सकाळी आॅफिसला जाण्याची घाई असायची. दिसायला सुंदर व नाजुक अशी स्वप्नाली थोडीफार जरी नटली तरी अफलातून सुंदर दिसायची. आकर्षक डोळे व बांधेसूद शरीर असलेली स्वप्नाली जणू एक स्वप्नपरीच दिसायला होती. स्वप्नालीचे वडिल ती वयाची तेरा वर्षांची असतानाच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले होते. त्यानंतर स्वप्नालीला तिच्या आईनेच काम करुन मोठे केले व ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवले. एकदा