कुनू गाणं शिकते

  • 5.5k
  • 2k

कुनू गाणं शिकतेकुनू एक छोटी गोड मुलगी. तिला गाणी म्हणायला खूप आवडायचं.गाणी ऐकायलाही खूप भारी वाटायचं तिला. आई म्हणायची,"कुनू तुझा आवाज फार छान आहे गं.मधेच गुणगुणतेस तेव्हा किती छान वाटतं ऐकायला. मला आणि बाबांना वाटतं की तू गाणं गायला शिकावंसं." पण कुनू मात्र मुळीच तयार होईना  असं गाणं शिकायला."छे मला असं एकाजागी बसून गायला मुळ्ळीच आवडत नाही. गाणं म्हणताना मला नाचायला पण आवडतं.आणि तुम्ही ते करू देत नाही मला. मला नाही शिकायचं ताईसारखं सा रे ग म. ताईची टीचर घरातच बसून तिला सारखं सारखं तेच तेच म्हणायला लावते. मला नाही आवडत एकाच भिंतीकडे बघत बसून गाणं म्हणायला!"   या गप्पांमधेच मे महिन्याची