मला काही सांगाचंय .... - Part - 13

  • 7.8k
  • 1
  • 4.1k

१३. प्रवास १ ती लगबगीने पावलं उचलत बस स्थानकच्या दिशेने निघाली... पावलं एकामागे एक जात असता मनात कितीतरी प्रश्न गर्दी करत होते.... रहदारीचे ठिकाण असल्याने रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार उंच अशोकाची झाडं होती.... तर मध्येच काही अंतराने गुलमोहराची झाडं होती.... झाडाखाली बसायला जागा म्हणून बाक ठेवलेले .... तापत्या उन्हात हे बाक म्हणजे एक सवंगडी .... सकाळ संध्याकाळ झाली की तिथं गर्दी असते ... तर रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यात येत असल्याने कि काय... या नवीन शहरात आल्यापासून तिला गुलमोहराचं एक वेगळंच आकर्षण वाटतं होतं... तिला मोहून टाकणारी गुलमोहराची झाडं आज वाऱ्यासोबत जणू गप्पा मारत होती.... पण आज त्यांच्याकडे साधी एक नजर सुद्धा तिने