मास्तर, शिक्षक आणि गुरुजी!

  • 4.1k
  • 843

' इतिहासाची पुनरावृत्ती होते " हे वाक्य वापरण्या इतकाच माझा आणि इतिहासाचा संबंध उरलाय. याला माझ्या पेक्षा, माझे शालेय जीवन, शाळा आणि शिक्षकच ज्यास्त जवाबदार आहेत. 'इतिहास ' तसा रंजक विषय, आमच्या काळी इतिहासच काय पण, समग्र शिक्षणाच्याच सानिध्यात रंजकता येऊ नये अशी ठाम भूमिका सर्वानी घेतली असावी! युद्ध वर्णना पेक्षा, सनावळी आणि तहाची कलमेच ज्यास्त! या सनावळी आणि तहाच्या कलमानी, आमची या विषयाची आवड मात्र 'कलम ' केली! आम्ही फक्त, परीक्षे पुरत्याच आमच्या 'कलमा ' झिजवल्या हे बारीक खरे आहे ! बरे इतिहास हा पूर्ण वेळ अन स्वतंत्र विषय नसायचा. इतिहासाच्या 'ढवळ्या ' सोबत, भूगोलाचा 'पवळ्या ' असायचा!