लेखन कलेचे अस्तित्व टिकवणे गरजेचे

  • 5.8k
  • 1.7k

लेखन कलेचे अस्तित्व टिकवणे गरजेचेआजच्या डिजिटल युगात लेखन प्रकारच कमी होत चाललंय. लिखाणाखेरीज अन्य मार्गांचे अतिक्रमण झाल्याने लेखन कला लोप पावते की काय अशी भीती साहित्यिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. लेखन कलेचे अस्तित्व टिकविण्याचे मार्ग शोधणे ही काळाची गरज ठरणार आहे…लेखनचं कमी होत चालले आहेआजची एकूण स्थिती पहिली तर लेखनचं कमी होत चालल्याचे जाणवते. पूर्वी साहित्यिक तासनतास विचारमंथन करून अन्य वाचन करून प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करीत. लिखित पुस्तके हे एकमेव त्याकाळात वेळ व्यतीत करण्याचे साधन होते. विषयांचे वैविध्य होते. तोचतोचपणा लेखनात नव्हता. वाचकांची नेमकी नाळ लेखकाला माहीत होती. पुस्तक वाचत असताना हे माझ्यावरच लिहले आहे असे प्रत्येकाला वाटत