ना कळले कधी Season 1 - Part 20

(20)
  • 11k
  • 2
  • 8.7k

'मी प्रत्येक वेळेस आर्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. हो मी आहे तिच्या बद्दल possessive, पण हे तिला कळत का नाही? मी तिला रागावलो हे खरं आहे. मी नव्हतं असं सगळ्यांसमोर बोलायला पण मी का बोलतो हे, त्या मागची काळजी, आपुलकी  हे तिला का कळत नाही. प्रत्येक वेळेस मी तिला हे नाही समजावून सांगू शकत. आणि जर तिला हे समजावून ही घ्यायचे नसेल तर मग काहीही फायदा नाही. ठीक आहे ती म्हणते ना आपला काहीही संबंध नाही तर मग आता नाहीच.', सिद्धांतने निश्चय केला. आर्या ऑफिस मधून काम संपवून निघाली. तिला विचार करून खूप त्रास होत होता, डोकं जाम दुखत होत,