ना कळले कधी Season 1 - Part 30

(17)
  • 9.8k
  • 3
  • 7.6k

      सिद्धांत काय  बोलतोय ह्या कडे आर्याचं अजिबात लक्ष नव्हतं. तो उठला आर्याच्या जवळ गेला, हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. आणि त्याने विचारलं, 'आर्या काय झालं? सगळं ठीक आहे ना?' ती एकदम दचकली आणि भानावर आली.  'काही विचारलं का सर?' 'अगं तुझं लक्ष कुठे आहे? तेच विचारतो आहे मी.' 'नाही कुठेच नाही.' जर तिच्या जागी दुसरं कुणीही असत तर आता पर्यंत सिद्धांतने  त्या व्यक्तीला अपमानित करून बाहेर पाठवलं असत पण केवळ ती आर्या असल्यामुळे तो हे सगळं सहन करत होता. 'आर्या काहीतरी बोल काही टेन्शन आहे का?' एव्हाना ऑफिस सुटलं ही होत आता त्यांच्या शिवाय कोणी राहील नव्हतं. आर्या काहीच