अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (10)

  • 4.4k
  • 2.2k

१०. दि ट्रुथ इज डिफ्रंट दॅन वी हॅव सीन सो फार - "काय गंमत आहे बघ!" तो माझी विचाराची लिंक तोडत म्हणाला,"हे सगळं घडलं, तेही अशा ठिकाणी जिथं सती मातेचं खूप महत्त्व आहे. नैनिताल, हे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक! नैनी तलावातील हिरवं पाणी हे सतीच्या डोळ्यांचं प्रतीक आहे अस मानलं जातं. आपल्या पतीचा, शिवाचा आपल्याच पित्याकडून झालेला अपमान सहन न होऊन त्याच्याच यज्ञकुंडात उडी घेऊन तिनं स्वतःला भस्मिभूत करून घेतलं. भगवान शिवांनी दक्षला मारून त्याचं यज्ञ उधळून लावलं आणि तिच्या अस्थी घेऊन भ्रमिष्टासारखे ते ब्रह्मांडभर फिरू लागले. त्यांचा विषाद संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश करू नये म्हणून त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढणं गरजेचं होतं