अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (12)

  • 3.6k
  • 1.9k

१२. फायनल वर्डीक्ट -मी अजूनही घुटमळतच होतो."काय? झालं ना सगळं?" अचानक मूड बदलत मिश्कीलपणे तो म्हणाला."नाही...!""बोला! तुझं तर समाधान कधी होतच नाही!" त्यानं मला टोमणा मारला."अजून तुम्ही या केस मध्ये मिळवलेली गन दाखवली नाही."(खरं तर मला लांबवलेली म्हणायचं होतं...)"आत्ता आमचा राघू बोलला!" म्हणत त्यानं दोन पिस्तूलं काढून माझ्या समोर ठेवली. त्या मिस्टर वाघच्या विंटेज गन्सच्या आवडीच्या तुलनेत फारशा विशेष नव्हत्या. रेग्युलर होत्या. एक 30 ऑगस्ट 2017 मॅनिफॅक्चरिंग डेट असलेली फिफ्थ जनरेशन ग्लॉक 19 जेन 5 सेमीऑटोमॅटिक पिस्टल व दुसरी 1976 मेड बेरेट्टा 92 सेमीऑटोमॅटिक पिस्टल होती. (बेरेट्टाचंच रणजितनं वापरलेलं एक मॉडेल '96' त्यानं 'डेथ विल'च्या वेळीही त्याच्या घरी आणलं होतं.)"दोन कुणाच्या?" मी