रुद्रा ! - ९

  • 8.3k
  • 2
  • 4.4k

मनोहर 'पंजाब ढाब्या'च्या मागच्या लॉनवर आला, तेव्हा जसवंत अधीरतेने एका कोपऱ्यातल्या टेबल जवळ उभा असलेला दिसला. मनोहरने आसपासचे निरीक्षण केले. लॉनवर फारशी गर्दी नव्हती. बहुतेक सुटे सुटे टेबल होते. जसवंतच्या टेबलच्या आसपास कोणी नव्हते. दूर एक मुसलमान आपल्या मुलासोबत काहीतरी खाण्यात दंग होता. मनोहर निश्चित मनाने जसवंतच्या टेबलवर जाऊन समोर बसला. "जसवंत, राघवला तुझा संशय आला आहे! कारण सापडलेल्या पुराव्या नुसार समभाव्य खून्याचे वर्णन तुझ्याशी तंतोतंत जुळतंय म्हणे!"" येऊ दे मला पकडायला! मी तयार आहे! तो आला तर मी सांगेन कि खुनाच्या रात्री तू आऊट हाऊस मध्ये गेला होतास!"" तू पेपर वाचत नाहीस का? आजच्याच पेपरमध्ये संतुकरावांचा खून साडे दहा ते