रुद्रा ! - १०

  • 6.7k
  • 2
  • 3.7k

राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. त्याने मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता. "हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!""सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. ""धम्माल कसली काका? नुसतीच धावपळ झाली. दोन्ही पक्षी भुर्र उडाले. हाती कोणीच आलं नाही! त्यात तो मनोहराचा अपघात!""हो, सांगितलं शकीलने.""बर, तुम्ही ताबडतोब व्हॅन आणि फोर्स घेऊन जसवंतच्या घरी जा. तो 'नक्षत्र'च्या आऊट हाऊस मध्ये राहतो हे तुम्हाला ठाऊक आहे. मी पाच मिनिटात तिकडेच येतोय. त्याला ताब्यात घ्यायचंय. आपल्याला आज बरीच