रुद्रा ! - १४

  • 7.4k
  • 3.8k

आज पासून रुद्राचे साक्षीदार साक्ष देणार होते. खून करतानाची व्हिडीओ असूनही रुद्राने खुनाचा आरोप धुडकावून लावला होता! कशाच्या जोरावर? हाच प्रश्न दीक्षितांना आणि प्रेक्षकांना पडला होता. म्हणून आजही न्यायालयाचा तो कक्ष भरगच्च भरला होता. रुद्रा काय दिवे लावणार? हीच भावना दीक्षितांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कोर्टाचे कामकाज सुरु झाले. "रामगोपाल हाजीर हो SSS !!" साक्षीदारांचे नाव पुकारण्यात आले. रामगोपालने दबकतच कोर्टात पाऊल टाकले. कोर्टाची पायरी चढण्याची हि त्याची पहिलीच वेळ असावी. तो खूप भेदरलेला दिसत होता. त्याने साक्षीदाराच्या पिंजऱ्यात,पिंजऱ्याचा लाकडी काठ गच्च धरून ठेवला होता. त्याचे हात आणि पाय लटपटत होते. घश्याला कोरड पडली होती. हि श्रीमंतांची लफडी अन गरिबाला हकनाक ताप असे काहीसे भाव