धडक - भाग-५

  • 8.9k
  • 1
  • 5k

भाग ५ - धडक (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) घोडखिंडीतून निघून राजांना आता एक दिड प्रहर लोटला होता. लवकरात लवकर राजांना कुमक करण्यासाठी विशाळगडाचा पायथा गाठणं गरजेचं होतं. बाजी अन त्यांच्या सोबत असलेले शंभर दीडशे मावळे भरधाव घोडा दौडवत होते. घोडीही जीव खाऊन दौडत होती. जंगलातील खाचखळग्यांच्या वाटेवरून दौडताना घोड्यांची दमछाक होत होती. धावून धावून तोंडाला फेस आला होता. आता कोस दोन कोसांचा अंतर बाकी होतं. विशाळगड नजरेस पडू लागला होता. पण आधीच