मी एक अर्धवटराव - 24

  • 4.8k
  • 1.6k

२४) मी एक अर्धवटराव! सकाळी सकाळी माझ्या भ्रमणध्वनीवर वेगळ्याच प्रकारची घंटी वाजली. अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मी घड्याळात पाहिले. सकाळचे सहा वाजले होते. तसा मी मनाशीच म्हणालो,'ही विशेष धून वाजतेय म्हणजे आज कुणाचा तरी वाढदिवस असणार. कुणाचा बरे! हे आठवणीत राहिले असते तर भ्रमणध्वनीवर गजर ठेवायची गरज का भासली असती? चला पाहू तरी..' म्हणत मी पडल्या पडल्याच भ्रमणध्वनी उचलला. भ्रमणध्वनीचा एक एक खटका दाबत मी त्या विशेष ठिकाणी पोहोचलो. मीच आठवणीसाठी लिहिलेला संदेश असा होता,'उठा. असे पाहताय काय नवरोबा? आज तुमच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे. 'चाखायची असेल गोड डिश, तर बायकोला लवकर करा विश!...' चला. बायकोला विश करूया.' म्हणून