प्रीतीची 'प्रेम'कथा - 14

  • 5.5k
  • 1.8k

१४ सापडला एकदाचा अर्थात दिवस मुलाखतीचा! मी निघाली. तोच काकुची मागून हाक आली. "प्री थांब!" मी थबकली तशी म्हणाली, "मी पण येतेय काकांकडे. तू त्यांना काय सांगशील? मीच बोलते." "ठीक. पण भिंदि आला तर तिकडे?" "तो काय संताजी धनाजी आहे इतिहासातला की तो राक्षस आहे खायला? मी बोलते काकांशी. बघू मग. आणि काय तो भिंदि सर्व संचारी ईश्वर आहे की काय?" "बरे चल." "आलेच. तयार होऊन." तात्यांच्या आॅफिसात आलो तर तात्या चकित झाले. त्यात कालिंदीला पाहून तर अजूनच! "काय इकडे कुठे स्वारी?" "स्वारी नाही, साॅरी तात्या.. हिचे काही काम होते. काल आलेली ना.. तिला म्हटले मी.. आॅफिसचे