मी एक प्रमुख पाहुणा

  • 6.7k
  • 2.3k

उद्धव भयवाळ औरंगाबाद मी एक प्रमुख पाहुणा! माझा मित्र दिवाकर देशपांडे याचा मला एक दिवस सकाळी सकाळीच फोन आला, "हॅलो, नमस्कार हो मानकर साहेब.""नमस्कार दिवाकरराव, बोला. अगदी 'अहो, जा हो' ने सुरुवात केलीस. बरं ते जाऊ दे. आज कशी काय सकाळी सकाळीच आठवण केलीस? काही विशेष?" मी विचारलं."हो, विशेषच आहे. तुला एक आनंदाची बातमी सांगायचीय. नव्हे, नव्हे, तुला एक आमंत्रणच द्यायचंय." तो म्हणाला; आणि त्यानंतर त्याने फोनवर जे काही सांगितले ते ऐकून मी तर खूपच खूश झालो. तो म्हणत होता, "तुला तर माहित आहेच की, औरंगाबादपासून पस्तीस किलोमीटरवर माझे जन्मगाव सावंगी आहे. अधून मधून मी सावंगीला जात असतो." "हो, कल्पना आहे