उधे ग अंबे उधे

  • 5.2k
  • 1.1k

उधे ग अंबे उधे....गोंधळ घालताना ज्या देवीनं आवाहन केले जाते त्या काही देवतांच्या आजी-माजी रूपांची माहिती जाणून घेऊया कोल्हापूरची महालक्ष्मी करवीरनिवासिनी आदिशक्ती महालक्ष्मीला जाणून घेण्यासाठी आधी श्री, लक्ष्मी आणि महालक्ष्मी म्हणजे काय ते पाहू. काळाच्या प्रवाहात जेव्हा मानवाच्या बुद्धीत हेय (नकोसे/ त्याज्य) आणि उपादेय (हवेसे/उपयोगी) वस्तूचा निर्णय करण्याची क्षमता आली तेव्हापासून भाग्य आणि शुभाशुभत्व या भावनांनी त्याच्या मनात प्रवेश केला . लक्ष्मीचा जन्म या भावनांपासून झाला आहे. जीवनासाठी जे काही हितकर, जे उदात्त, जे सुंदर, जे आनंददायी त्या सगळ्याशी लक्ष्मीचा दृढ संबंध आहे. किंबहुना लक्ष्मी हा शब्दच पावित्र्य व मांगल्याशी जोडला गेला आहे. पुराण काळात लक्ष्मी शब्दाचा ‘भाग्य’ असाच अर्थ होता