बाबूची रागदारी

  • 6.6k
  • 2k

उद्धव भयवाळ औरंगाबाद बाबूची रागदारी स्वभावाने थोडा विक्षिप्त असलेला, तरीही आम्हा साऱ्या मित्रांना आवडणारा औरंगाबादच्या आमच्या दोस्त कंपनीतला आमचा दोस्त बाबू लामतुरे हा एके काळी शास्त्रीय संगीतातला नावाजलेला गायक होता, हे आज कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही. "रागदारी ऐकावी तर ती बाबूचीच" असे त्यावेळचे दर्दी रसिक आवर्जून एकमेकांना सांगायचे. बाबूचे शास्त्रीय गायन म्हटले की, रसिकांची गर्दी झालीच म्हणून समजा. शास्त्रीय गायनाचे अनेक पुरस्कार मिळवलेला आणि एकापेक्षा एक अवघड राग आपल्या सुरेल आवाजाने गाऊन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आमचा हा कलंदर मित्र मागील अनेक वर्षांपासून मात्र संगीत क्षेत्रापासून शेकडो कोस दूर आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. असे काय घडले की