घरातला तरणा बैल

  • 5.1k
  • 1.2k

"का यड्यावाणी कराय लागलाय..? कानसुडात येक पडली की सरळ हुशील.." अडकीत्त्यातली सुपारी फोडत बाप माझ्यावर ओरडला. आय दरवाजाच्या चौकटीवर डोक्यावरचा पदर तोंडाजवळ आणून चुपचाप बघत राह्यलेली. तीच्या डोळ्यात माझ्यासाठीची काळजी दिसत व्हती. बापाला भरीसभर घालायला चुलतापण बाजूलाच बसल्याला. मी गप्प हुतो. मला तालुक्याच्या काॅलेजाला पुढच्या शिक्षणाला जायचं हुतं. बाप काही केल्या ऐकत नव्हता. त्याचं म्हणणं त्याच्या जागी बरोबर हुतं. पण मला त्याची कारणं पटत नव्हती. शेतीवर आमचं सगळं चाललेलं. त्यात न्हाय म्हणायला एक म्हस तेवढी हुती आमच्याकडं. बैल नव्हता, आन् बाप थकायला आलेला.. मंग घरात मीच एक बैल बाकी राहीलेला. चुलत्याची गणती आमच्या घरात नव्हती तो अगुदरच येगळा झालेला. आमची