भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ४)

  • 6k
  • 2
  • 2.2k

संजनाने सुप्रीला घरी सोडलं. ऑफिसमधे जरी काही दाखवलं नसलं तरी तिने कोमल-संजनाचं बोलणं ऐकलं होतं. आकाशची आठवण झाली तिला. आणि तो दिवसही आठवला. फ्रेश होऊन खिडकीसमोर बसली होती सुप्री. आकाशच्या आठवणी जाग्या झाल्या. " आई !! मी गच्चीवर आहे. " म्हणत ती गच्चीवर आली. मे महिन्याची संध्याकाळ ती. थोडासा वारा वाहत होता. ढगांचे तर नामोनिशाण नाही आभाळात. सुप्री पुन्हा तेच आठवू लागली... " तो " दिवस.. !! गेल्यावर्षी जून मध्ये पाऊस कमी पडलेला , त्यामुळे वातावरणात म्हणावा तसा थंडावा नव्हता. आकाशने सुद्धा "भटकंती" ला जाण्याआधीच... " जूनमध्ये पाऊस कमी असेल