आला श्रावण मनभावन भाग १

  • 7.7k
  • 1
  • 2.7k

आला श्रावण मनभावन भाग १ श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावणामध्ये पावसाच्या दोन जोरदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते.श्रावणाच्या आगमाने अवघी सृष्टी हिरवीगार झालेली असते . वेगवेगळी फुलेही उमललेली असतात . त्यांवर भिरभिरणारी फुलपाखरे बघतांना मन सुखावते. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच घालतात. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची