भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ८)

  • 5.2k
  • 2.1k

पुन्हा आठवण, त्यात पावसाच्या ढगांनी आभाळ भरत चाललं होतं. थंड गार वारा... मागे असलेल्या झाडाच्या पानांची प्रचंड सळसळ... " आठवणी काढू नये... किती वेळा सांगितलं तरी आमच्या येडीला कधी कळणार हे त्या गणूलाच माहित... " आकाशने टपली मारली सुप्रीच्या. क्षणभरासाठी, तिला आकाश शेजारीच बसला आहे असा भास झाला. सर्वच आठवणी उफाळून बाहेर येण्याचा प्रयन्त करत होत्या. नको थांबायला येथे... घड्याळात पाहिलं... संध्याकाळचे ५:३० वाजतं होते. सुप्री उभी राहिली, पुढे जाणार तर कोणीतरी ओढणी पकडून ठेवलेली... आकाश मुद्दाम कधी सुप्रीची ओढणी गुपचूप टेबलला बांधून ठेवायचा... आनंदाने सुप्रीने मागे पाहिलं. मगाशी आलेल्या वाऱ्याच्या झोताने , ओढणी टेबलाला गुंडाळली होती. पुन्हा थंडगार हवा