भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १३)

  • 4.7k
  • 1.6k

" मराठी छान बोलतोस तू .. म्हणजे इथला या गावातला वाटतं नाही " सईने मागूनच आकाशला विचारलं. अजूनही ते त्या डोंगरावरच बसलेले होते. " Actually, मला माहीतच नाही मी कुठला आहे ते... " आकाश तिच्याकडे न बघताच बोलला. " अरे व्वा !! इंग्लिश शब्द सुद्धा माहित आहे का .. very good .. पण नक्की राहतोस कुठे तू... " ," सांगतो, आता पुढे जाऊया. तुम्ही तुमच्या वाटेने... मी माझ्या वाटेने.. " ," अरे !! आम्हाला आणखी फोटो काढायचे आहेत.. असा कसा जातोस सोडून.. by the way... कुठे निघाला आहेस.. "," माहित नाही... पाय जातील तिथे... चला निघूया.. पावसाला सुरुवात झाली कि अवघड होईल