आवंढा

(11)
  • 8.5k
  • 1
  • 2.4k

माझा एक मित्र आहे. तो चित्रपट, टीव्ही सिरीयल यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. मधून अधून काही चित्रपटात, टीव्ही सिरीयल मध्ये छोट्या भूमिका देखील करतो. पण ते फक्त हौस म्हणून. मुख्य काम मात्र डायरेक्टरला असिस्ट करण्याचेच. परवा त्याची आणि माझी बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. खरं तर तो असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे काय हेच मला नीट समजत नव्हते. मग त्याला विचारलेच. “यार... तू असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे नक्की काय करतोस? कित्येक वेळेस तर तू टीव्हीवर दिसतोस पण तुझे नाव मात्र कोणत्याच यादीत दिसत नाही. असे कसे?” मी भाबडेपणाने प्रश्न विचारला. “अरे काही नाही रे... ज्या दिवशी आपल्या गावात चित्रपटाचे किंवा एखाद्या