घटस्फोटा नंतर......

  • 4.6k
  • 1.3k

घटस्फोटा नंतर...... तीन दिवसाची लांब सुट्टी सुमिताला तीन युगासारखी वाटत होती। पहिला दिवस घर कामात निघून गेला, दुसरा दिवस आराम करण्यात आणि घरच्या साठी काही जरुरीचे सामान विकत घेण्यात गेला परंतु आज सकाळपासून सुमिताला रिकामेपणा जाणवत होता। तसं पाहिलं असता एकटेपणा तिला कित्येक महिन्यापासूनच वाटत होता परंतु आज सकाळपासूनच तिला कंटाळवाणे वाटत होते। स्वयंपाक करून कामवाली गेली होती। सकाळची नुकतेच अकरा वाजले होते। तिचे स्नान नाश्ता सर्व आटोपले होते। घराची झाड़झुड आणि कपडे धुणार्‍या बायका येऊन गेल्या होत्या। म्हणजे आता दिवसभरात कोणीही येणार जाणार नव्हता। दूरदर्शनाचा कंटाळा आला म्हणून सुनीताने दूरदर्शन बंद केले। फोन हातात घेतला आणि गोष्टी करण्याच्या हेतूने