भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २३)

  • 4.2k
  • 1.8k

पहाटे पहाटे आलेल्या वादळाने पूर्ण रात्र भिजवून टाकली होती. दुसरा दिवस, सुरु झाला तेव्हा वारा त्याच्या स्वभावानुसार इकडून -तिकडे नुसता उडत होता. पहाट होतं होती, कालच्या पावसाने सारा परिसर धुवून निघाला होता. हिरवा रंग काय उठून दिसत होता सांगू , पण अमोलच्या मनात मात्र संध्याकाळ दाटत होती. काल आलेल्या वादळात... तो स्वतःही वाहून गेला होता. राहिला होता तो फक्त हाडा-मांसाचा देह. भावनाहीन झालेला बहुदा. पुढचे २ दिवशीही तेच. चल बोललं कि चालायचं .... आणि बस बोललं कि बसायचं. ना खाण्यात लक्ष ना कश्यात.. कॅमेरा त्या वादळात बॅगमध्ये ठेवला तो ठेवलाच. कोणाशी बोलणं नाही... अगदी