भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २५)

  • 5.9k
  • 2k

अमोल निघाला आहे , हे सर्वाना कळलं होतं. " जायलाच पाहिजे का ... अमोल सर ... ? " संजनाने विचारलं. सुप्री दुरूनच अमोलला बघत होती. " पप्पांना मदत पाहिजे आहे तिथे. जावे लागेल. नाहीतरी आता प्रवास संपला आहे माझा. " अमोलच्या या वाक्यावर संजनाने सुप्रीकडे वळून बघितलं. " असं का बोलतो आहेस अमोल ... " कोमल " म्हणजे तुम्ही पुढे जाणार आता... मी दिल्लीला चाललो.. मग संपला ना प्रवास इकडचा... " अमोलचे तर नक्की झालेलं निघायचे. थांबून तर चालणार नाही. " तुम्ही जाणार कसे दिल्लीला... " एका मुलीने विचारलं. प्रश्न तर बरोबर होता तिचा. अमोलनी कोमलकडे पाहिलं. कोमलला समजलं. " मला नक्की माहित नाही. but