मला काही सांगाचंय..... ३४ - १

  • 5.6k
  • 2.1k

३४. लपंडाव कुमारचे आई वडील तिच्याशी काही जुन्या आठवणी तेव्हा ताज्या झाल्याने पुन्हा एकदा नव्याने आठवून बोलत होते , ती सारं मन लावून फक्त ऐकत होती ... मध्येच त्यांना दिलासा देत होती , तिला पूर्ण कल्पना होती की कुमार म्हणजे त्यांचा एकमेव आधार .. नियतीनं का असा खेळ मांडला अस तिला क्षणभर वाटून गेलं , काही वेळानंतर जुन्या आठवणीत भिजवून तो भावनारूपी पाऊस शांत झाला ... सोबतच त्यांचं बोलणं थांबलं आणि तिच्या मनात पावसानंतर तळं साचावं तसे विचार एकामागून एक साचायला लागले ... मध्येच त्याच्या डायरीत वाचलेले काही प्रसंग त्या साचलेल्या पाण्यात होडी बनून इकडे तिकडे बेभान होऊन जलविहार करू