मला काही सांगाचंय..... ३६

  • 5k
  • 1.9k

३६. का ? सुजित , आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सोबतच कुमारच्या वॉर्डजवळ पोहोचले . इतक्यातच डॉक्टर त्याच्या रूममधून बाहेर पडतांना त्यांना दिसुन आले , त्याचे आई वडील , आकाशचे वडील , सुजितचे वडील डॉक्टरशी बोलत होते , झपाझप चार पाच पावलं टाकत ते तिथं जाऊन ठेपले ... डॉक्टर देवांश सांगत होते की , " कुमारची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली आहे , तुम्ही त्याला भेटू शकता फक्त जास्त लोक एकसाथ जाऊ नका आणि त्याला त्रास होईल म्हणून जास्त बोलू पण नका .. समजलं ना , येतो मी .." सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली , आई वडिलांसह प्रशांतने रूमचे