भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ८

  • 4.4k
  • 1.8k

विचार करता करता डोकं दुखायला लागलं. सुप्री डोक्याला हात लावून बसलेली. संजना चहा घेऊन आली. " उरलेलं डोकं पण गेलं वाटते. " संजना सुपारीला हसून बोलली. " बोला बोला ... गरिबांना काय पण बोलतात लोकं .. " ," तुला काय झालं डोकं पकडायला. " ," आकाश गं ... " ," हा ... त्याचा आलेला का कॉल ... मेसेज.. " संजनाने लगेच विचारलं. " एकदा आलेला .. पण आवाजच येतं नव्हता त्याचा. पुन्हा केला मी, तर लागला नाही. मेसेज आलेला कि मी सुखरूप पोहोचलो. कुठे आहे ते सांगितलं नाही. मी उद्या निघायचं ठरवलं आहे. पण जाऊ कुठे " सुप्रीने अडचण सांगून टाकली एकदाची. तश्या दोघी