भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ११

  • 5.3k
  • 2k

कुठेतरी दूरवर , ढगांच्या आड सूर्योदय होतं होता. ढगांमध्ये राहून गेलेल्या मोकळ्या जागेतून सूर्याची किरणे गुपचूप त्या हिरव्या माळरानावर विसावत होती. मधेच गुडूप होऊन जातं, ढग जरा बाजूला सरले कि पुन्हा उजेड. ऊन पावसाचा खेळ नुसता. वाऱ्याने झाडे डोलत होती. जणू काही आनंदाने गाणी गात होती सर्वच. पावसाळा सुरु झालेला ना.. सारेच आनंदात होते. सुप्री ते सर्व , हॉटेलच्या बाल्कनीत उभी राहून पाहत होती. संजना अजूनही झोपलेली होती. काल रात्रीच त्यांचे आगमन झालेलं. रात्री कुठे जाऊन आकाशला शोधणार म्हणून स्टेशन जवळच असलेल्या एका हॉटेल मध्ये मुक्काम केला. सुप्रीला लवकर जाग आली तशी ती बाल्कनीत उभी