राहिल्या त्या आठवणी

  • 8k
  • 1.6k

राहिल्या त्या आठवणी... अण्णासाहेब त्यांच्या दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसले होते. नुकताच फराळ झाला होता. त्यांच्या सौभाग्यवती आत चहा करीत असताना आवाज आला,"काय चालले आहे, अण्णासाहेब?" आवाज ओळखून अण्णासाहेब म्हणाले,"या. या. तात्यासाहेब, या..." पाठोपाठ स्वयंपाक घराच्या दिशेने पाहून म्हणाले,"तात्यासाहेब आलेत आहेत बरे का? त्यांचाही चहा टाक...""बरे..." आतून प्रत्युत्तर आले."आज कुठे जाणार तर नाहीत ना?""तात्या, कुठे जाणार? खरे तर मस्त पावसाळी वातावरण आहे. मस्तपैकी...""गरमागरम भजे खावेसे वाटतात ना? मलाही खूप इच्छा होतेय हो पण आहाराचे बाबतीत कडक असणाऱ्या गृहमंत्री दाद देत नाहीत...""अगदी मनातील बोललात तात्या. 'घरोघरी गॅसच्या चुली'