नर्मदा परिक्रमा - भाग ५

  • 21.3k
  • 7.1k

नर्मदा परिक्रमा भाग ५ श्रद्धापूर्वक नर्मदा परिक्रमा करीत असताना वारंवार असा अनुभव येतो की नर्मदा माता कायम आपल्या सोबत आहे .अनेक संकटातून ती आपल्यला तारून नेत असते .अनेक लोकांनी केलेल्या परिक्रमेतील अनुभव आपल्यला थक्क करतात . एकदा चालायला सुरवात केल्यावर मनाचा कणखरपणा दाखवावा लागतो . रोज कमीतकमी ३५ किमी चालले तरच हा टप्पा तीन महिन्याच्या अवधीत पूर्ण होतो आणि तुम्ही निर्धारित वेळेस निर्धारित ठिकाणी पोचू शकता . प्रथम प्रथम रोज इतके चालण्याची सवय नसल्याने पायाला फोड सेप्टिक वगैरे होऊ शकते . रात्रीची जागा मिळेल तिथे, अंधारात, मंदिरात, उघडय़ावर, पारावर झोपावे लागते . हळू हळू वातावरणाशी समरसता होत जाते. तेथील वातावरण