वेड पुरस्काराचे

  • 3.5k
  • 1.4k

वेड पुरस्काराचे! देशातील लोकसभा निवडणुकींचे निकाल लागले आणि मागील पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या पक्षाला आणि पंतप्रधानांना मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून दिले. मागील पाच वर्षे पंतप्रधान पदावर असणारी व्यक्तीच पुन्हा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झाले, ती काळ्या दगडावरची रेघ होती, जनतेचा आदेशही तसाच होता. या पंतप्रधानांच्या मागच्या काळात त्यांच्या कार्यप्रणालीवर, विचारसरणीवर ठपका ठेवून, देशात असहिष्णुता माजली आहे, जातीयवादी डोके वर काढत आहेत, दिवसाढवळ्या जुलूम होताहेत, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य या सर्वांवर गदा येते आहे या विचाराने प्रेरित झालेल्या, तथाकथित