भविष्यवेडे

(22)
  • 9.5k
  • 3.3k

◆◆ भविष्यवेडे ◆◆ 'पेपर...' बाहेरुन आवाज आला आणि अजय कॉफीचा प्याला बाजूला ठेवून बाहेर धावला. पोऱ्याने टाकलेला पेपर उघडत तो आत आला. सोफ्यावर टेकल्याबरोबर त्याने भविष्याचे पान काढले. आगामी आठवड्यात नवीन वर्ष सुरु होत असल्यामुळे ज्योतिष्यकाराने संपूर्ण वर्षाचे भविष्य दिलेले होते.अजयची शोधक नजर त्याच्या राशीवर स्थिरावली. ठळक भविष्य त्याने वाचले. 'क्रांतिकारी बदल!' हा मथळा वाचून अजयला खूप आनंद झाला. त्याच आनंदात त्याने हावरेपणाने एका दमात सारे भविष्य वाचून काढले. तो आणखी आनंदला. एकंदरीत त्याचे आगामी वर्ष उत्कृष्ट, भरभराटीचे आणि आनंदमयी जाणार होते. भविष्यातील शेवटच्या काही ओळी