आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 1

  • 6.6k
  • 2.9k

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) आळसवाद “You want everything without doing anything, and may anything can happen, even everything”- shisha varug, Japnees Pholiospher. “तुम्ही काही न करता सगळ्यांची अपेक्षा करता आणि कदाचित काहीही होवू शकतं, सगळं सुदधा.”- जापनीज तत्वज्ञ शीशआ वारुग. (शुदध प्रामाणिक भांषातर). आहे ते, आहे तसं चालयं ते ठीक आहे. कुठं काय-काय, कोण-कोण, जे चालयं ते बदलू पाहतायात, त्यासाठी प्रयत्न करत चालयेत, ते उगाच जाणून घेत, तसं आपणहून करण्याच्या वाटयाला स्वतःहून जाऊ नये, जमलसं तर जास्तीच जास्त त्यावर आपली मत मांडायची, इथंपर्यंत ठीक आहे, आणि या आणि अश्या वागण्यातूनच जन्म होतो आळसवादाचा, तो आपली तत्व मांडतो, लोकांमध्ये भिनतो