अनिकेतचा निश्चय

  • 10.2k
  • 3.4k

उद्धव भयवाळ औरंगाबाद अनिकेतचा निश्चय {बालकथा} आदित्य आणि अनिकेत एकाच शाळेत आणि एकाच वर्गात म्हणजे आठव्या वर्गात शिकत होते. दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त होते. पण दोघांच्या स्वभावात खूप फरक होता. आदित्य अभ्यासू होता तर अनिकेतला अभ्यासाचा खूप कंटाळा होता. त्यामुळे अनिकेतचे वर्गातसुद्धा सरांच्या शिकविण्याकडे लक्ष नसायचे. नेहमी इतरांच्या खोड्या करण्यात त्याला रस असायचा. याचा परिणाम म्हणून त्याला परीक्षेत नेहमी कमी गुण मिळायचे. तो शाळेत दिलेला गृहपाठ कधीच करून आणीत नसे. त्यामुळे नेहमी त्याला गुरुजींचा ओरडा खावा लागायचा. याच्या उलट आदित्य खूप अभ्यास करायचा. परीक्षेत छान गुण मिळवायचा. शाळेतील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तो भाग घ्यायचा