बारा जोतिर्लिंग भाग ५

  • 8k
  • 2
  • 2.7k

बारा जोतिर्लिंग भाग ५ नर्मदेच्या डोंगरावरील ओमकारेश्वर -अमलेश्वर भारतातील बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेले ‘ओंकारेश्वर’ हे ज्योतिर्लिग मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या किना-यावर आहे. नर्मदा व कावेरी या दोन नद्यांच्या मध्ये दीड किलोंमीटरचे बेट तयार झाले असून ते ॐ आकाराचे आहे. मांधावा नावाच्या पर्वतावर दोन मंदिरे असून त्यापैकी एक ओंकारेश्वर आणि दुसरे अमलेश्वर या नावाने ओळखले जाते. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठी आहे. हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थाने आहेत. दुसरे ॐकार या नावाचे लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकार अमलेश्वर असे म्हणतात.