अघटीत - भाग २० - अंतिम भाग

(94)
  • 11.3k
  • 2
  • 4k

अघटीत भाग २० रात्री नऊ वाजता पद्मनाभ घरी आला . आज दिवसभर भरपूर पळापळी झाली होती त्यामुळे खुपच थकला होता . सकाळपासून जेवायला पण फुरसत नव्हती मिळाली वरदा नुकतीच दवाखान्यातून येत होती . आता परत जेऊन तिला डबा घेऊन जायचे होते . पद्मनाभला बघुन ती म्हणाली” बरे झाले आलास रे.. जेऊया एकत्रच .. सकाळी लवकर गेला आहेस ते आलाच नाहीस ना आज परत .. मावशी सांगत होत्या “ तिच्याशी काही बोलायच्या आधी पद्मनाभ क्षिप्राच्या खोलीकडे निघाला खोलीत डोकावल्यावर त्याला दिसले क्षिप्रा पाठमोरी बेडवर झोपली होती . तो परत येऊन हातपाय धुऊन जेवायला आला तेव्हा वरदा म्हणाली “अरे आज जरा तिला