राजेश्री - पुस्तकानुभव

  • 18.9k
  • 4.7k

राजेश्री - पुस्तकानुभवना. स. इनामदार लिखित या कादंबरी बद्दल थोडक्यात. एखादी गोष्ट जो पर्यंत आपल्याला मिळत नाही तो पर्यंत आपण तिला मिळवण्यासाठी धडपडत राहतो. त्या गोष्टीबद्दलची ओढ तीव्र होत जाते आणि ती मिळवण्यासाठी आपली धडपड आणखीनच वाढत जाते. ती गोष्ट मिळवल्यानंतर होणारा आनंद, हा स्वर्ग सुखाहूनही मोठा असतो. पण कधी कधी मात्र आपली घोर निराशा होते. शिवराय, छत्रपती, राजे, महाराज अश्या नावांनी उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपण वाचावे, बोलावे, लिहावे तेव्हढे कमीच. पुण्यातील बऱ्याचशा पुस्तक प्रदर्शनांना अन अक्षरधारा बुक गॅलरीला भेटी होतात. शिवरायांबद्दल नेटवर अन पुस्तकांमध्ये भरपूर वाचणं होतं. पुरंदरेचं राजा शिवछत्रपती,