जादूचा आरसा

(15)
  • 34.3k
  • 3
  • 11.1k

उद्धव भयवाळ औरंगाबाद जादूचा आरसा बालमित्रांनो, फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एक होतं गाव. त्या गावाचं नाव होतं आनंदपूर. त्या गावाच्या नावाप्रमाणेच तेथील सर्व लोक आनंदी होते. सुखासमाधानाने जीवन जगात होते. नेहमी सत्य बोलत होते; आणि इतरांशी बंधुभावाने वागत होते. तसेच व्यवहारास प्रामाणिक होते. त्यामुळे त्या गावात कधीच कुणाचे कुणाशी भांडण होत नसे. पण एक दिवस काय झालं, त्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस राहण्यासाठी आला. त्याचं नाव होतं धनराज. त्याच्याजवळ खूप संपत्ती होती पण तो फार कंजूष होता. तो नेहमी खोटे बोलायचा. व्यवहारामध्ये इतरांना फसविण्यात त्याला धन्यता वाटायची. तो फार दुष्ट होता. दारी आलेल्या याचकास कधीही भिक्षा