ती एक शापिता! - 13

  • 6.4k
  • 3.1k

ती एक शापिता! (१३) त्या रात्री सुहासिनीला कशाच्या तरी आवाजाने जाग आली. त्या आवाजाचा तिने अंदाज घेतला. तिच्या शेजारी झोपलेली आशा झोपेत बरळत होती, 'अमर, आय लव यू.. आय ..आय.. लव यू...ओ.. अमर..अमर...' तिच्या तशा शब्दांनी सुहासिनी पूर्ण जागी झाली. तिने आशाला हलवले. गाढ झोपेत असलेली आशा जागी झाली नाही तरी तिची असंबंध बडबड मात्र थांबली. सुहासिनीने घड्याळात बघितले. रात्रीचे तीन वाजत होते. सकाळ होईपर्यंत सुहासिनीला झोप लागली. तिच्या डोक्यात सारखे आशाचेच विचार येत होते. तिला वाटले, 'ही पोरगी अशी का वागते? हिच्या मनात काय आहे?घरकामाचे सोडा परंतु अमरसोबतचे हिचे संबंध कोणत्या स्तरापर्यंत गेले असतील? आत्ताची हिची बडबड झोपेत असेल