कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ... भाग - ६

  • 6.4k
  • 1
  • 2.8k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग- ६ वा -------------------------------------------------------------------------------- मी अनुषा , अभिजित सागर देशमुखची मैत्रीण ... अगदी खूप जवळची मैत्रीण आहे मी त्याची . त्याच्या मनातली .. सखी , त्याची ड्रीम गर्ल...स्वप्न सुंदरी.. वगेरे वगरे.. असे खूप काही बोलतो कधी कधी ..मूड मध्ये असला म्हणजे . मला पण हा अभि..कभी कभी नाही .हो . आधीपासूनच तो आवडतो मला ,अगदी आमची घट्टमैत्री होण्याच्या आधी पासून आवडायचा आम्ही कोलेजला असतांना पासून . अगदी “पेह्ली नजर मे..मुझे तो प्यार हो गया .. पण, असे पाहून ज्याच्यावर आपले प्रेम जडते “, त्याचा प्रतिसाद मिळतो की नाही ? ही मनात भीती ,