ती एक शापिता! - 20

  • 5.5k
  • 1
  • 2.8k

ती एक शापिता! (२०) दोन-तीन दिवसांनी अशोकला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. तो घरी आला. घरातील वातावरण बरेच तंग होते. माधवीने घर सोडायची पुन्हा चर्चा केली नाही. त्या सायंकाळी अशोक बैठकीतल्या पलंगावर डोळे लावून पडला होता. समोरच्या सोफ्यावर सुबोधही चिंताग्रस्त चेहऱ्याने बसला होता. अशोकच्या चेहऱ्याकडे सुबोधचे लक्ष गेले. त्याच्या मनात विचार आला, 'अशोकचे असे का झाले? देवाने माझ्यासारख्या अर्धवट पुरुषाला संतती दिली तीही तशीच अर्धवट! मुलगी दिली तीही तशीच वासनांकित! परजातीच्या मुलासोबत पळून गेली. तो घाव अशोककडे बघत सहन केला परंतु भविष्यात हे ताट वाढून ठेवलेय हे माहिती असते तर? मी त्याला समजून घ्यायला कमी पडलो. मी माझ्याच विवंचनेत राहिलो. तो तारुण्यात