ती एक शापिता! - 24

(12)
  • 6k
  • 2.7k

ती एक शापिता! (२४) दुसऱ्या दिवशी सकाळी सुहासिनीने सुबोधसोबत रजा पाठवली. दुपारी नेहमीप्रमाणे पीयूष शीळ वाजवत घरात शिरला. सुहासिनीला दिवाणखान्यात पाहून तो गडबडला. बोबडी वळल्याप्रमाणे झालेल्या अवस्थेत त्याने विचारले, "काकू, आज घरीच?" "रजा घेतलीय. तुला तर माझी काही अडचण होणार नाही ना?" सुहासिनीने विचारले तसा पीयूष जास्तच गोंधळला. त्याने गडबडून विचारले, "मला कशाची अडचण? उलट बरे झाले, दिवस कसा नुसता जात नाही. खोली कशी खायला..." "का रे, माधवी असते ना?" "असते. बोलते थोडेफार. पण किती वेळ? तिला तिचीच कामे संपत नाहीत..." असे म्हणत पीयूष खोलीत निघून गेला... सुहासिनीने अधिक खोलात जाऊ नये म्हणून. कारण सुहासिनीने अधिक चौकशी केली तर त्याच्या